जळगांव:- येथे दि. १९ व २० फेब्रुवारी दरम्यान शुक्रवार व शनिवार रोजी सरदार लेवा भवन हॉल येथे शिवजयंतीच्या निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चा आयोजित तर जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन शुक्रवार सकाळी १०.००वाजता करण्यात आले आहे. खुल्या वयोगटात प्रथम १० खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यात येतील.
त्यात प्रथम पारितोषिक रुपये ५००० व्दितीय ३००० तृतीय २००० चतुर्थ १५०० व पाचवे बक्षीस १००० सहावा क्रमांक ९०० सातवे ८०० आठवे ७०० नववे ६०० दहावे ५०० रुपये असे राहील. तर विविध अशा ५ वयोगटातील खेळाडूंसाठी तसेच उत्कृष्ट पहिल्या तीन महिला खेळाडूंना प्रथम ५०० द्वितीय ३०० तृतीय २०० देऊन गौरविण्यात येईल. इच्छुक खेळाडूंनी नावनोंदणी कांताई सभागृह येथे करावी. सर्व खेळाडूंनी मास्क व सोशल डिस्टसिंग चे पालन करणे अनिवार्य आहे याची खेळाडूंनी नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी भरत कर्डीले (9595950270) प्रवीण ठाकरे(9226375077) व परेश देशपांडे (9423572174)यांचेकडे नाव नोंदणी करावी. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे,विजय देसाई ,हिरेश कदम, सचिन धांडे ,भरत कर्डिले व जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्यावतीने अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादिया उपाध्यक्ष फारूक शेख यांनी केले आहे.