जळगाव;- प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे-हावडा व मुंबई-जालना या अप व डाऊन मार्गावरील गाड्या १४ फेब्रुवारीपासून दररोज धावणार आहेत. या गाड्या पुढील आदेशापर्यंत सुरू राहतील. या सर्व गाड्यांचे संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण सुरू आहे. रेल्वेने हावडा-पुणे गाडी क्रमांक ०२२८० अप सुपरफास्ट स्पेशल गाडी १४ फेब्रुवारीपासून हावडा स्थानकातून दररोज रात्री १०.१० वाजता सुटून ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ७.५ वाजता पुण्याला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०२२७९ डाउन सुपरफास्ट स्पेशल गाडी १६ फेब्रुवारीपासून पुणे येथून दररोज सायंकाळी ६.३५ वाजता सुटणार.
————————–