मुंबई (वृत्तसंस्था) – बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे जोरदार चर्चेत आहे. अशातच कंगनाने आणखी एक ट्विट करत थेट दिल्लीचे मुख्यमंत्री ‘अरविंद केजरीवाल’ यांच्यावर टीकास्त्र सोडले. सध्या कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला रिट्विट केलं आहे.
दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी तिने केजरीवाल यांना डिवचणारे ट्विट केले आहे. केजरीवाल यांनी 2015 मध्ये एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये दादरीच्या मॉब लिचिंगमध्ये मारल्या गेलेल्या इखलाखच्या घरी भेट देणार असल्याची माहिती दिली होती.
आणि आता याच ट्विटचा संदर्भ देत कंगनाने लिहिले, ‘केजरीवालजी, मला आशा आहे की,तुम्हीदेखील रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना पाठिंबा द्या. तुम्ही एक राजकारणी आहात. आशा आहे आता ‘स्टेटमॅन’ बनाल,’ असे ट्विट कंगनाने केले.