जळगाव;- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे. त्यांच्या समर्थकांनी भाजप’ला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. भाजपला पहिला मोठा धक्का आज श्री.खडसेंनी दिला. त्यांचे भुसावळमधील १८ विद्यमान नगरसेवक व १३ माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकूण ३१ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कार केला.
भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्याची नावे अशी- भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ.भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगसेवक दत्तू सूरवाडे, हेमलता इंगळे, माजी नगरसेवक राहुल मकासरे,
नगरसेविका पती-प्रशांत अहिरे, किशोर पाटील, वसंत पाटील, माजी भाजप अध्यक्षा पुरूषोत्तम महाजन, आशिक मुन्ना तेली, माजी नगरसेविका सोनल महाजन,
नगरसेविका पत्नी-सौ.पौर्णिमा प्रमोद नेमाडे, प्रिया बोधराज चौधरी, शालिनी भागवत कोलते, प्रिती मुकेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख अजीज, शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी पं.स.सदस्य प्रभा सपकाळे, दर्शन चिंचोले, एजाज खान खलील खान, आरती दिनेश नेमाडे, अनिकेत सुधीर पाटील, आशिष महाजन, पृथ्वीराज पाटील, विनय बऱ्हाटे, सुमित बऱ्हाटे, यशांक पाटील, माजी नगरसेवक किरण महाजन, निलेश वारके, चैताली अमोल इंगळे, प्रशांत नरवाडे, गणेश पाटील, संघदीप नरवाडे, माजी नगरसेवक शेख चिराग शेख गुलाब, जलील कुरेशी, शेख पापा शेख कालू, शेख निवाम शेख निमामुद्दीन, इस्माईल अकबर मेनन, अजीम खान खलील खान, आफताब खान, मो अमीन मो बिसार कुरेशी, शेख शब्बीर शेख इस्माईल, बिस्मीला तडवी, हसनूददीन पेंटर, रहेमूदीन, शेख रउप शे गनी, डॉ. निलेश झोपे, अब्बास शाह, रहीम शाह, वासीम खान आजीम खान, झाकीर खाटीक, रेहान कुरेशी.