पाचोरा :- शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुनीताताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा शहर महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की भगिनींनो आपण कुटुंबाचे समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहात संसाराचा एक चक्र आहात आपण सहकार्य करा प्रेमाने ममतेने कुटुंबाचा सांभाळ करा मुलीप्रमाणे सांभाळा अनाथाश्रम रिकामी होतील जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भविष्यात आपल्यावर ही अनाथाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. सासू-सासरे मूलबाळ पती यांना जिव्हाळ्याने सांभाळा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाचोरा शहर महिला आघाडीच्या वतीने आदरणीय सुनीताताई पाटील यांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने साडीचोळी सप्रेम भेट देण्यात आली . सुनिता ताई यांच्यावतीने पाचोरा शहर महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना साडीचोळी सप्रेम भेट देण्यात आली..