• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2023
in Uncategorized
0

पाचोऱ्यातील गुंडगिरीविरोधात पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी नगरपालिकेसमोर काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण हि पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी घटना असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना याचा तीव्र शब्दांत निषेध व्यत्क्त करीत आहे. संदीप महाजन यांच्यावर झालेला मारहाणीचा प्रकार निंदनीय असून अशाप्रकारे मारहाण करून गुंडगिरीचे समर्थन करणाऱ्या या तथाकथित गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संदीप महाजन आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन गुरुवारी १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात. त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यावेळी किशोर पाटील यांनी वाईट वाटून त्यांना फोन करून शिवीगाळ करीत धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर कबूलही केले होते. या घटनेनंतर मात्र पाचोरा शहरात संमिश्र पडसाद उमटले होते. संदीप महाजन यांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करत आमदार किशोर पाटील यांच्यापासून स्वतःला व कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्यात आले नव्हते.

बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली. आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख अशी धमकी त्यांना गुंडांनी दिली. या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

“मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी बोलतो. घटनेतील गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सूचना देतो. पत्रकारांवर अन्याय होणार नाही” या शब्दात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली. निवेदन देताना नरेंद्र कदम, सुमित देशमुख, हेमंत पाटील, विजय वाघमारे, ललित खरे, भगवान सोनार, रजनीकांत पाटील, कमलेश देवरे, अमोल कोल्हे, योगेश चौधरी, वाल्मिक जोशी, वर्धमान जैन, विश्वजीत चौधरी, काशिनाथ चव्हाण, शाळीग्राम पवार, नाजनीन शेख, संधींपाल वानखेडे, नितीन नांदुरकर, विजय पाटील, धर्मेंद्र राजपूत, वाहिद काकर, सागर चौधरी, हेमंत ई. पाटील, अयाज मोहसीन, अस्लम खान, किशोर शिंपी, राहुल शिरसाळे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

मारहाणीचा निषेध करतो,

समर्थन करीत नाही : आ. किशोर पाटील

दरम्यान, आ. किशोर पाटील यांनी काही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी पत्रकारांच्या विरोधात नाही. मी हल्ल्याबद्दल पोलिसांकडून माहिती घेतली आहे. कारवाई करण्याबाबत त्यांनी मला सांगितले आहे. मी पत्रकारांना हात जोडून विनंती करतो कि, मी पत्रकार म्हणून नव्हे तर प्रवृत्ती म्हणून त्याला शिवीगाळ केली आहे. स्वतःला पत्रकार म्हणून संदीप महाजन इतरांना ब्लॅकमेलिंग करीत आहे. मारहाणीचा निषेध करतो, समर्थन करीत नाही., अशा शब्दात आ. किशोर पाटील यांनी स्वतःचा बचाव केला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/gavgudavar-karvai-kara-news/
Previous Post

आ. किशोर पाटील यांच्या चिथावणीवरून पत्रकाराला मारहाण, कारवाई करा

Next Post

स्वतःच्या अल्पवयीन मुलीला ठार करणाऱ्या दारुड्या बापाला आजन्म कारावास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वतःच्या अल्पवयीन मुलीला ठार करणाऱ्या दारुड्या बापाला आजन्म कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

September 24, 2026
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon