आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार आज शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी गाव चलो अभियानांतर्गत भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील या रावेर तालुक्यातील लाल माती या गावात मुक्कामी दाखल झाले आहेत.
याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढावो जिल्हा संयोजिका सारिका ताई चव्हाण या देखील उपस्थित होत्या सर्वप्रथम आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची डॉक्टर केतकी पाटील यांनी संवाद साधला. यानंतर रात्री पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या हातावरच्या पोळ्या आणि गलवानी चा सामूहिक जेवण करत आस्वाद घेतला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा अविष्कार देखील बघितला. डॉ केतकी ताई ह्या गावात मुक्कामी असून रविवार 11 रोजी देखील सकाळ पासून गावात संवाद अभियान राबविले जाणार आहे.