पारोळा (प्रतिनिधी) – चर्मकार समाजाला शासनाने अधिकाराने दिलेल्या योजनांचा फायदा तळागाळातील शेवटच्या चर्मकार बांधवांपर्यंत पोहोचविण्याकामी आणि त्यांचा सर्वागीण विकास होऊन जिवनमान उंचावण्यासाठी संत रविदास युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जळगांव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदी सुरेश पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड करतांना संत रविदास युवा फाऊंडेशनचे स॑स्थापक तथा अध्यक्ष दत्ताभाऊ कदम या॑च्या आदेशाने आणि दिपक भाऊ ढवळे राज्य पुर्व प्रदेशाध्यक्ष,
या॑च्या मार्गदर्शनाखाली तसेच रविंद्र काकडे खांदेश विभाग संपर्क प्रमुख यांच्या सुचनेनुसार सुरेश पाटोळे या॑ची स॑त रविदास युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती करतांना संत रविदास युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा अध्यक्ष दत्ताभाऊ कदम, प्रमुख सल्लागार दिनेश जाधव, महिला सल्लागार सुरेखा सुर्वे, राज्य सचिव दत्तात्रय कदम आदीं सर्व राज्य पदाधिकारी उपस्थित होते. तरी सुरेश पाटोळे यांची बिनविरोध जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल चर्मकार समाज बांधवांकडुन शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.