जळगाव ;- जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या फ्रान्सच्या पर्यटकाला जळगावात आल्यानंतर वाहन किंवा राहण्यास हॉटेल उपल्बध न झाल्याने तो रस्त्यावर फिरताना आढळून आल्याने त्याला तात्काळ रोटरी जळगाव ईस्टच्या अध्यक्ष विनोद भोईटे पाटील आणि जीएम फाउंडेशनचे पदाधिकारी होनाजी चव्हाण यांनी यापर्यटकाबाबत विचारपूस करून पोलिसांच्या मदतीने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे. फ्रान्सच्या पर्यटकाला कोरोना विषाणूचा संसर्ग आहे का ? याबाबत आरोग्य यंत्रणा तपास करीत असून यामुळे मात्र अनेकांची तारांबळ उडाली होती . जुलिअन सर्च पेरी वय ३८ असे या फ्रान्सच्या पर्यटकांचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , फ्रान्स देशातून जुलिअन सर्च पेरी वय ३८ हा पर्यटक काही दिवसांपूर्वी भारतात आलेला आहे. रविवारी तो जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी रेल्वेने जळगावात आला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र बंद असल्याने त्याला हॉटेल मिळत नव्हते. शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद असल्याने तो शहरातील रस्त्यांवर फिरत होता.रोटरी जळगाव ईस्टच्या अध्यक्ष विनोद भोईटे पाटील आणि जीएम फाउंडेशनचे पदाधिकारी होनाजी चव्हाण यांनी ही बाब लक्षात आली . जळगाव पोलीस दलातील शीघ्र कृती दलाचे कर्मचारी कृष्णा पाटील त्यांनी तातडीने त्याची विचारपूस करून त्याला कोर्ट चौकात थांबवले. खबरदारी म्हणून कृष्णा पाटील यांनी पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती कळवली. त्यानंतर १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून घेत परदेशी पर्यटकाला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी हलवले.