जळगाव ;- जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ रोजी दिवसभर जनता कर्फ्यू देशभर राबविण्याचे आवाहन केले होते . या आवाहनाला जळगाव जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत या कर्फ्यूत सहभागी झाल्याने जनता कर्फ्यू हा १०० टक्के यशस्वी झाल्याचे चित्र जळगाव शहरासह जिल्ह्यात दिसून आले . यावेळी शहरातील राष्ट्रीय महामार्गासह , राज्य मार्गावरील प्रमुख चौकांसह शहरातील नगरे ,उपनगरांमध्ये सन्नाटा दिसून आला . एसटी बस ,रेल्वे स्थानक , प्रवाशी रिक्षांसह ,ट्रक ,खासगी वाहतूक पूर्णपणे बंद दिसून आली . तसेच अत्यावश्यक सेवा वगळता आणि तुरळक वाहने आढळून आली . ठिकठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभाग आणि मनपाच्या कर्मचाऱयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . अजिंठा चौफुलीहून औरंगाबादकडे जाणारा राज्य महामार्गावर आज सकाळपासूनच रस्ते ओस पडल्याचे दिसून आले . कायम वाहतुकीच्या कोंडीत अडकणारा अजिंठा चौफुली हा चौक आज मोकळा श्वास घेताना आढळून आला . तसेच शहरातील आकाशवाणी चौक , स्वातंत्र्य चौक ,जळगावातील नवीन बस्थानक, रेल्वेस्टेशन ,नेहरू चौक, टॉवर चौक , फुले मार्केट , सुभाष चौक , पोलन पेठ , दानाबाजार ,नवी पेठ , गोलाणी मार्केट आदी जास्त वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट दिसून आला. यावेळी पोलिसांसह आरोग्य, मनपा कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
अमळनेर येथे शुकशुकाट
भडगाव येथे असलेला शुकशुकाट