पारोळा ;– कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर थैमान घालत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. प्रधानमंत्री यांनी देशभर लाॅकडाऊन केला आहे.
राज्यात या विषाणूचा संसर्ग वाढू नये. याकरिता मा. मुख्यमंत्री विविध महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. तर जिल्हा प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी या निर्णयांची अंमलबजावणी करीत आहे. याचा परिणाम म्हणून पारोळा शहरात लाॅकडाऊनच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे हेच आपल्या हिताचे असेलही ते म्हणाले .
नगराध्यक्ष या नात्याने करण पवार यांनी सर्व शहरवासियांना नम्र आवाहन केले की, आपणास जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता पडणार नाही.
लाॅकडाऊन संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अनावश्यक प्रवास टाळा.
प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी आहे. आपण सहकार्य करा . घाबरू नका ,पण जागरूक राहण्याचे असे विनंतीवजा आवाहन त्यांनी पारोळावासीयांना केले .