पारोळा ;- पारोळा शहरातील राज्यशिक्षक मनवंतराव साळुंखे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात .
जगभरात तसेच देशात कोरोना यां विषाणू ने थैमान घातले आहे . याला प्रतिबंध करण्यासाठी शासन सर्वोत् परी प्रयत्न करत आहे . अशातच साळुंखे सर यांनी ही घोषवाक्य बनवत समाजामध्ये ,जनतेमध्ये जणजागृती करण्याच्या प्रयत्न केला आहे . त्यांची घोषवाक्य अशी –
टाटा आणि बाटा I
उचलत आहेत आपला देशसेवेचा वाटा I
बघत नाही ते कसला नफा तोटा I
आपणही नाही जास्त , जरी दिला गरजवंताला जगण्यासाठी घाटा I
तोही नाही जगण्यासाठी नाही छोटा |
मात्र काळजीपुर्वक वाटा आणि भेटा |
सुरु ठेवु कोरोना हटविण्याचा नेटा आणि रेटा |
आपल्या दक्षतेने त्याला कुटा I
नका फुटु देवु इतरत्र त्याला फाटा |
गरजवंताच्या कामास येवु देवु शिल्लक नोटा |
गर्दीतुन स्वतःहुन दुर हटा |
दुसऱ्याची व आपली नको कोणावर कोरोनाची छटा I
सध्या तो आहे मोठा, नाही थीटा |
आपली काळजी हाच त्याला मारण्याचा गोटा |
त्याच्या पासुन दूर राहुन त्याला पीटा I
गरज फक्त आज अन्नाची पोटा I
लॉक डाऊन पाळुन पंख कोरोनाचे छाटा |
घरातच शांत डोळे आपले मिटा |
‘ मी माझा रक्षक ” हा डोक्यावर आपल्या मानाचा फेटा I
घरातील उगीच बाहेर पडणाऱ्याला डाटा I
अशा पद्धतीने जणजागृती करणाऱ्या राज्यशिक्षक मनवंतराव साळुंखे यांचे सर्वोदूर कौतुक होत आहे .