एरंडोल (प्रतिनिधी) – गणपती बाप्पा मोरया….च्या गजरात आज एरंडोल शहरात श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. घरगुती, सार्वजनिक गणेश मंडळात आज श्रींच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. बाप्पाचे आगमनाच्यावेळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. यामुळे उत्साह द्विगुणीक झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी ‘ना ढोल..ना ताशे…ना वाद्यांचा गजर, ना मिरवणूका…’ तरीही जल्लोष व भक्तीमय वातावरण अनुभवण्यास आले.
तसेच, एरंडोल येथे इतिहासात प्रथमच एरंडोल शहर पोलीस प्रशासन, एरंडोल नगरपरिषद प्रशासन, एरंडोल महसूल विभाग, एरंडोल शहर शांतता कमिटी, शहरातील नोंदणीकृत व बिगर नोंदणीकृत गणेश मंडळ यांच्या पुढाकाराने एकगावंएक_गणपती या संकल्पनेतून गणेशोत्सवाला प्रारंभ व श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.
तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार बांधव, फोटोग्राफर असोसिएशन सर्व गणेशमंडळांचे सदस्यांची उपस्थिती होती.दहा दिवस सर्व शासकीय नियमांचे पालन करून विविध उपक्रमांनी साजरा होणार आहेत. ते खालील प्रमाणे.