• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव, (प्रतिनिधी) – राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि संगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा ‘युनिटी इन पॅट्रियोटिझम – एक भारत… एक सूर…’ हा विशेष देशभक्तीपर कार्यक्रम  ( दि. ३० जून) सकाळी ८ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित केला होता.


याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे कमांडीग ऑफीसर धिरज मिनोत्रा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, डाॅ. अश्विन झाला, रोटरी क्लब जळगाव अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मुख्याध्यापक संघटनेचे राज्यअध्यक्ष जे. के. पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रकल्प प्रमुख ॲड. सागर चित्रे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सहभागी शाळांचा सम्मान करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्रायोजित व रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला गेला. ‘स्वरांतून राष्ट्रप्रेम, गीतांतून एकात्मता’ ही संकल्पनेतून  १६  शाळेतील १०००वर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गितांचे सादरीकरण केले. १५० वर्षांचा वारसा असलेल्या वंदे मातरम्… या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माणसाने माणसाशी माणसासम.. हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे… यातुन माणुसकीचा जागर झाला. साने गुरुजींच्या खरा तो एकचि धर्म… झेंडा ऊंचा रहे हमारा.. या झेंडा गितानंतर राष्ट्रगीत जन गण मन.. ने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाला विद्यार्थी, युवक, शिक्षक, मुख्याध्यापक, रोटरी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्तीचा अनोखा सांगितीक अनुभव जळगावकरांना आला. अब्दुलभाई यांनी घोषणा देऊन देशभक्तिपर वातावरण निर्मिती केली. रोटरी क्लब जळगाव अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी संचालन केले.

 सहभागी शाळांचे झाले कौतुक..

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, ए. टी.झांबरे, झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा, श्रीमती शेवंताबाई टोके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय, श्रीराम विद्यालय मेहरूण, जिजामाता विद्यालय, या. दे. पाटील विद्यालय, बाहेती विद्यालय, जय दुर्गा  विद्यालय, शंकुतला जे विद्यालय, पी. के. गुळवे विद्यालय , जे. जे. पंडित हायस्कूल,लोहारा ता. पाचोरा या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभागाबद्दल सम्मान करण्यात आला.

प्रत्येक कृती देशप्रेम ठरावी – धिरज मिनोत्रा

धिरज मिनोत्रा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आईवडिलांचा प्रत्येकाने आदर्श ठेवावा,  स्वच्छता असो की आपण करत असलेली कुठल्याही सामान्य कृतीमधून देशप्रेमाला प्राधान्य क्रम दिला पाहिजे. यासाठी बाजारात जाताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर कमी करून आपला देश स्वच्छ सुंदर ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले.

स्वच्छता, शिस्तीतुन देशभक्तीची प्रेरणा – दीपमाला काळे

गांधी रिसर्च फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमातुन शिस्त, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा संदेश विद्यार्थ्यांनी घ्यावा. समूहशक्तीतुन शहराला सुंदर शहर करावे यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, ती वाढवावी व जतन करावी. बालवयात जे संस्कार पेरली जातात तिच भविष्यात सामाजिक स्तरावर कामी येतात.

फोटो कॅप्शन – एक भारत.. एक सुरात देशभक्तीपर गीत सादर करताना हजारो विद्यार्थी.


 

 

Tags: https://kesariraj.com/ek-bharat-ek-sur-news/
Previous Post

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

Next Post

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

July 4, 2026
मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 4, 2026
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम
जैन कंपनी

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon