प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल आरोग्यासाठी’ संदेशातून जनजागृती
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे ’प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल मोलाचे’ या संकल्पनेवर आधारित जागतिक हृदय दिन निमीत्त जनजागृतीपर ५ कि.मी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे तसेच हृदयविकाराबाबत समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित ५ किलोमीटर वॉकथॉन मध्ये नर्सिंगचे विद्यार्थी, प्राध्यापक व सहभागी उत्साहाने सहभागी झाले. नियमित चालणे, व्यायाम, संतुलित आहार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्व वॉकथॉनच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.यावेळी रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. हृदयाचे आरोग्य, निरोगी जीवनशैली, नियमित शारीरिक व्यायाम, संतुलित आहार आणि हृदयविकार प्रतिबंध या विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशील रील्स तयार करून आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे मांडला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण, सामाजिक सहभाग आणि सर्जनशील जनजागृती यांचा संगम साधण्याची संधी मिळाली. हृदयविकार प्रतिबंध, निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि शारीरिक सक्रियतेबाबत विद्यार्थी व समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींच्या माध्यमातून निरोगी हृदय व निरोगी जीवनाचा संकल्प करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.











