• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

धक्कादायक, अतिक्रमणधारकांनी डॉक्टरांचे वाहन फोडून केली जबर मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

एकावर कोयत्याने वार, संशयितांमध्ये महिला पोलिसाचा समावेश ?

जळगावातील सिंधी कॉलनी रस्त्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर रविवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेरील अतिक्रमणधारकांनी विनाकारण प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात डॉक्टरांच्या सहकाऱ्याला हाताला कोयता लागल्याने तो जखमी झाला असून उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन संशयितांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि महिला पोलीस असल्याची बतावणी करीत होती. दरम्यान, घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

डॉ. नीरज चौधरी (वय  ३३, रा. प्रताप नगर, जळगाव) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे प्रताप नगरात रुग्णालय आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील निलकमल हॉस्पीटल येथे रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी रविवारी २९ रोजी सकाळी ९. ३० वाजता सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह गेले होते. तिथे डॉ. चौधरी यांनी (एमएच १९ सीएफ ५६२८) या चारचाकीने पोहोचले. तेथे डॉ. चौधरी वाहन पार्क करीत असताना एक वयं अंदाजे २५ वर्ष वयाचा इसम हात गाडीवर नारळ विक्री करणारा धावत आला. त्याने सांगीतले की, तुम्ही ज्या जागेवर गाडी पार्क केली आहे, त्या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या असे म्हणाला. तेव्हा डॉक्टरांनी, दुसरीकडे वाहन लावायला जागा नाही. हि सार्वजनिक जागा आहे, असे सांगून दवाखान्यात निघून गेले.

त्यानंतर १५ मिनिटांनी हॉस्पीटलचा कामगार निलेश पावरा याने डॉ. नीरज चौधरी यांना  सांगितले की, नारळाचे हातगाडीवाला इसम तुमच्या वाहनाची तोडफोड करत आहे. तुम्ही खाली या असे सांगितल्याने ते बाहेर आले. तेव्हा  नारळविक्रेता व त्याच्या सोबत असलेला एक इसम वय अंदाजे २५ वर्षे असे दोघे अचानक डॉ. चौधरी यांचे अंगावर धावून आले आणि दमदाटी करू लागले. तेव्हा डॉक्टरांचे सहकारी अजय सेनानी व मंगेश दांगोडे यांनी मध्ये पडून सोडविण्याचा प्रयत्न केला.  तेव्हा त्यांनी त्यांना देखील मारहाण केली.  एका इसमाने नारळाच्या हात गाडीवरील कोयता आणुन मंगेश दांगोडे याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे हातातील कोयता मंगेश दांगोडे याचे उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील तळव्याच्या भागाला लागून तो जखमी झाला.

त्यानंतर त्या ठिकाणी एक महीला शिवीगाळ करत डॉक्टरांकडे येवून म्हणाली की, तु माझ्या आईला नारळाची गाडी का लावू देत नाही असे म्हणुन तिने डॉ. चौधरी यांना हाताबुक्यांनी मारहाण करून मी पोलीस आहे, तुला काय करायचे ते कर असे म्हणाली. त्यानंतर त्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस दाखल झाले. सदर संशयितांची नावे अर्जुन राठोड, सोनु चव्हाण व एक महिला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/dr-jabar-marhan-keli-news/
Previous Post

तरुण गायकांच्या प्रतिभेतून रंगली “तेज-गंधर्व” शास्त्रीय संगीत स्पर्धा

Next Post

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदिवासी, दुर्गम भागात दौरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदिवासी, दुर्गम भागात दौरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon