आरोग्य व्यवस्था, विविध योजनांचा घेतला आढावा
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी पाडे, दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रांत भेटी दिल्या. तेथे आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन विविध योजनांची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी २८ रोजी आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. बिराजदार, कुष्ठरोगचे सहा. संचालक डॉ. जयंत मोरे यांनी रावेर व यावल तालुकाअंतर्गत असलेली दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी- नवसंजिवनी गावे, पाडे, उपकेंद्र त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी भेटी दिल्यात. सदरील भेटीमध्ये राष्ट्रीय कुटूंब कल्याण, नियमीत आरोग्य सेवा सत्र (लसीकरण ), साथरोग सर्वेक्षण गृह भेटी, आयुष्यमान भव हेल्थ मेळा, एन. सी. डी. कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, लहान मुलांची तपासणी, साथरोग प्रतिबंधात्मक उपायोजना, सुरक्षीत मातृत्व आश्वासन सुमन, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम, हिवताप नियंत्रण कार्यक्रम याविषयी माहिती दिली.
नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढणेकरिता आवाहन केले, अॅनेमिया मुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, मानसिक आरोग्य एन सी डी कार्यक्रम, गरोदर माता तपासणी, डॉग बाईट, रेबीज, स्नेक बाईट, पाणी शुद्धीकरण ईत्यादी सर्व कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे गाव पाडयांवर नवजात मुलांची स्वतः तपासणी केली. यावेळी रावेरच्या तालुका आरोग्याधिकारी डॉ. विजया झोपे, भरारी पथकाचे वैदयकिय अधिकारी डॉ. प्रकाश ठाकरे, मिलींद लोणारी व उपकेंद्र प्रा. आ. केंद्र स्तरावरील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.