अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील अंतुर्ली गावातील तरूणाने शेतातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजले नाही. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयेश शरद पाटील (वय-२३) रा. अंतुर्ली ता.अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे जयेश पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह राहायला होता. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मुरलीधर आनंदा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील अगोने करीत आहेत.