संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटीलांनी केले अभिनंदन,पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
जळगाव (प्रतिनिधी) : येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रथम बॅचाा प्रथम वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. पहिल्याच वर्षी आयुर्वेद महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागल्याने खान्देशसह विदर्भात नावलौकीक प्राप्त झाला आहे.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या २०२४-२५ या पहिल्या बॅचमधील प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालात आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने महाविद्यालयाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून मनुजा टोपे ही ७७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी कौतुक केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजीस्ट्रार चेतन चौधरी, अॅनाटॉमी विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी, संहिता विभागप्रमुख डॉ. सुगौतकुमार तायडे, क्रीया शरीरविभागप्रमुख डॉ. रूपाली चौधरी, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. मयूरी चौधरी, डॉ. अंजना शिंदे, प्रा. अमिता निकम यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचाा प्रथम वर्षाचा निकाल उत्तम लागल्याने महाविद्यालयाची मान उंचावली आहे.