यावल तालुक्यातील वड्री गावातील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील वड्री गावात शाळा सुटल्यानंतर रेहाना बशीर तडवी (वय १३) आणि तनुजा नसीर तडवी (वय ८) या दोन्ही विद्यार्थिनी घरी जात होत्या. दरम्यान, घरी जाताना रस्त्यात एका मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत दोघा विद्यार्थिनींना चावा घेतला.
नागरिकांनी या दोन्ही बालिकांना कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. तर सरपंच अजय भालेराव, ग्रामसेवक मजित तडवी, बशीर परमान तडवी व नागरिकांनी दोन्ही बालिकांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे आदींनी या बालिकांवर उपचार केले. दरम्यान, वड्रीत मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असून विद्यार्थ्यांमध्ये भिती पसरली आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.