जळगाव ( प्रतिनिधी ) – गंगानगर अप एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना धावत्या रेल्वेतून पडल्याने सुमारे ५० वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी अवस्थेत महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.









