जळगाव तालुक्यातील शिरसोलीजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे ४५ वर्षीय इसम हे ठार झाले. ही घटना १ ऑक्टोबर रोजी शिरसोली ते जळगाव दरम्यान घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनीलकुमार पलटन पासवान (४५, रा. मुजफ्फरपूर, बिहार) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सुनीलकुमार पासवान व त्यांचा पुतण्या अमर पासवान हे रेल्वेन पुणे येथून दाणापूर (बिहार) येथे जात होते. त्या वेळी सुनीलकुमार हे रेल्वेतून पडले.(केसीएन) या विषयी रेल्वे पायलटने शिरसोली स्थानकावर माहिती दिली. तालुका पोलिसांना या विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. खिशात सापडलेले रेल्वे तिकीट व अन्य कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली.
रेल्वेत काका दिसत नसल्याने अमर पासवान याने त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडत नसल्याने तो जळगाव स्थानकावर उतरला. त्याने पोलिसांना माहिती दिली व दुसरीकडे तालुका पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर ओळख पटविण्यासाठी अमरला बोलविले. त्यानेही ओळख पटविली.या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.