चोपडा (प्रतिनिधी ) –– चोपड्यातील प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या दोन विद्यार्थिनींनी सी. ए. फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश मिळविले
कु साक्षी सुरेश साखला, कु.क्रांती मनोहर पाटील या दोघे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत प्रिया शिक्षा फाऊंडेशन कॉमर्स या क्लासेसच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
कु.क्रांती पाटील या विद्यार्थिनीला सर्वाधिक 284 /400 गुण मिळाले असून तिने चोपड्यातुन सी. ए. फाऊंडेशन अकाउंट विषयात आणि math’s (मॅथसं ) विषयात सर्व प्रथम आली आहे. या यशाचे कौतुक व्हावे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी म्हणून क्लॉसेस कडून त्या विध्यार्थीनींचा सत्कार येथील गांधी चौकातील बालाजी मंदिरच्या हॉल मध्ये करण्यात आला. या वेळी विद्यार्थी मित्र मैत्रिणी,पालक ,मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होती
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत असतांना सांगितले की, आमचे मित्र मैत्रिणी पुणे, मुंबई,नाशिक हून क्लासेस करूनही त्यांना आपल्या पेक्षा कमी गुण मिळत असतात चोपड्यातच राहूनच आम्ही हे यश संपादन केल्याने मनात सहर्ष आनंद होत आहे. छोट्या गावाच्या क्लॉसेस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष असते. त्याचंच फायदा आमच्या सारख्या विध्यार्थीना होत असतो आम्ही आज जे ही यश संपादन केले आहे त्यात क्लासेसच्या प्रत्येकवर लक्ष म्हणून आम्ही खूप खुश असल्याची भावना दोन्ही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
प्रामुख्याने सौ. शोभाताई सांखला,मनोहर पाटील सर, प्रवीण जैन मार्गदर्शक शिक्षक सी.ए.कु .तृप्ती अग्रवाल , प्रा.कु प्रिया शर्मा.(संचालिका ) फाउंडेशनचे हजर होते.
ह्या विद्यार्थ्यांनी हे यश चोपडा तालुक्यात राहून मिळविले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षकांनी आमचा पाल्यांकडे वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे हे यश आज आमचा मुलीला मिळाले अशी भावना…सौ शोभाताई सांखला यांनी व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, असे क्लोसेस छोट्या छोट्या तालुका पातळीवर झाले तर ग्रामिण भागातून ही नक्कीच सी. ए.सारखे उच्चशिक्षण घेऊ शकता. असे ही त्यांनी सांगितले
विद्यार्थ्यांनी हे यश खूप मेहनती ने मिळविले त्यांना सांगितले तशी तयारी त्यांनी करून घेतल्याने त्यांना हे यश मिळाले.ही भावना सी. ए तृप्ती अग्रवाल यांनी व्यक्त केली तर प्रिया शर्मा (संचालिका) यांनी बोलताना सांगितले की, आम्ही चोपड्यात आता पर्यंत सर्वोच्च निकाल देत आहोत आणि देत राहू असे तसेच नेहमी आमचा क्लासेस चा निकाल हा 50 % ते 100% च राहतो. बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थी व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. जवळ पास 10-20% . कमी विदयार्थी संख्या ,कमी फी , वैयक्तिक लक्ष सर्वोच्च निकाल हेच आमचे ध्येय आहे असेही प्रिया शर्मा (संचालिका)यांनी सांगितले.
कुठे ही बाहेरगावी न जाता लाखो रुपये न वाया न घालवता तुम्ही चोपड्यातच राहून आपले ध्येय गाठू शकतात.अशी भावना मनोहर पाटील यांनी व्यक्त केली.