दुचाकीसह दोघांना अटक
जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील तलाठी कार्यालयासमोर दोन जण गांजा घेवून जात असल्याची गोपनिय माहिती आयपीएस सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाल्याने त्यांनी या परिसरात दोन जणांना दुचाकीवर गांजा घेवून जातांना पकडले. याबाबत याठिकाणी आज सायंकाळी 5 वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. निलाम रोहन व पथकाने गांज्याची मोजमाप केली. सदर गांज्या हा 7 ते 8 किलो असल्याचे कळाले आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली असता, सदर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. सदर ही कारवाई हजारोंच्या घरात असल्याचे समजते.