मंगरूळ येथे मुलींच्या मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उदघाटन
अमळनेर : – प्रत्येकाने स्वप्ने खूप मोठी पाहून लोक त्यांना वेडे समजही आणि हीच ध्येयवेडी व्यक्तीच इतिहास घडवितात असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी केले .
तालुक्यातील मंगरूळ येथील मुलींच्या मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या उद्घाटन प्रतापराव दिघावकर यांच्याहस्ते करण्यात आले.
मंगरूळ येथील स्व.अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ.अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे नामकरण आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र उदघाटनप्रसंगी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपप्राचार्य डॉ.एस.ओ.माळी, ग.स.बँकेचे माजी चेअरमन झाम्बर पाटील, नौदलाचे चे ग्रुप कॅप्टन अविनाश पाटील, ॲड.सूर्यवंशी, संस्थाचालक जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, संस्थेच्या संस्थापक सुहासिनी पाटील, चेअरमन श्रीकांत पाटीलआदी उपस्थित होते .
यावेळी अभ्यासिकेस आय.जी.प्रतापराव दिघावकर यांच्यातर्फे एक लाखाची पुस्तके आणि चार संगणक देण्यात आले.
चेअरमन श्रीकांत पाटील , माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रगती काळे, नंदिनी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी योगेश पाटील, शिक्षक व्ही.ए.पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास उपसरपंच संजय पाटील, हिरालाल पाटील, रामकृष्ण वाणी, किशोर पाटील, विश्वास पाटील, धनराज पाटील, प्रफुल पाटील, वाल्मीक पाटील, संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील, श्रुती पाटील, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील विद्यार्थी व मंगरूळ ग्रामस्थ उपस्थित होते.