• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धरणगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील नराधम मुख्याध्यापकाने चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नराधम मुख्याध्यापक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह राहते आणि स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी मुख्याध्यापक नंदलाल मराठे हा शाळा भरण्यापूर्वी सकाळी १० वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने या चिमुरडीला शाळेत आधी बोलावून घेत असे. त्यावेळी शाळेत इतर कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे, तर तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण केले जात होते.
या घृणास्पद प्रकाराला चिमुरडीने विरोध केल्यास नराधम मुख्याध्यापक तिला बेदम मारहाण करायचा. तसेच, याबद्दल कोणालाही काही सांगितल्यास ‘तुझे आई-वडील मरून जातील,’ अशी भीतीदायक धमकी देऊन तो तिला गप्प बसवत असे. या जाचाला कंटाळलेली पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यानंतर आपल्या मावशीकडे राहण्यास गेली. तिथे गेल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली आणि तिने जेवण करणेही बंद केले. मुलीच्या बदललेल्या वर्तनामुळे काळजीग्रस्त झालेल्या नातेवाईकांनी तिला प्रेमाने विश्वासात घेतले असता, तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण भयानक प्रकार उघड केला.
३० एप्रिललाही अत्याचार; नराधम जेरबंद
शाळेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल रोजीही या नराधम मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित मुख्याध्यापक नंदलाल मराठे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच धरणगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत. विद्यामंदिराला कलंकित करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, या नराधम मुख्याध्यापकाला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरतम् शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.


 

 

Tags: dharangaon chimurdivar aatyachar
Previous Post

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

Next Post

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon