नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले आहे.
मात्र, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले आहे. आनंद शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. शर्मा हे जी 23 गटाचे सदस्य आहेत, त्यांच्या आणखी एक सदस्याने गुलाम नबी आझाद यांनीही जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदावरून नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.