चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तापी नदीत ३१ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २५ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आली आहे. याबाबत दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कावसिंग पाहाड्या बारेला (वय ३१ रा. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. चोपडा शिवार, चोपडा) असे मयत तरूणाचे नाव आहे. कावसिंग बारेला हा तरूण कुटुंबासह चोपडा शिवारात वास्तव्याला होता. गावाजवळ असलेल्या तापी नदीत त्यांचा पाय घसरून पडल्याने बुडून दुदैवी मृत्यू झाला. परिसरातील पट्टीचे पोहणाऱ्या तरूणांनी त्याला बाहेर काढून खासगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी ती मयत घोषीत केले. दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.