• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे

पाचोरा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

पाचोरा (जळगाव) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव जिल्हा (पश्चिम विभाग) यांच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी, महिला संघटना, युवा संघटना तसेच कर्मचारी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य पदग्रहण सोहळा सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पाचोरा येथील रामदेव बाबा लॉन्स, जारगाव चौफुली येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला
व्यासपीठाला कै.नानासाहेब शिरसाठ यांचे नाव देण्यात आले होते

या सोहळ्याला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. कल्याणरावजी दळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने किमान ५०० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा अशी ठाम मागणी केली

कार्यक्रमाला राज्य कार्याध्यक्ष दामोदर (काका) बिडवे, राज्य प्रांताध्यक्ष उत्तमराव सोलाने,राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील बोरसे, ह.भ.प. मनोहर खोंडे सर (उत्तर महाराष्ट्र कर्मचारी विभागीय अध्यक्ष), रवींद्र परशुराम शिरसाट (राज्य कार्यकारिणी सदस्य), जगदीश मधुकर वाघ (राज्य कार्यकारिणी सदस्य) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

५०० कोटींच्या निधीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार – कल्याण दळे साहेब

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे म्हणाले की, बारा बलुतेदार समाज हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पारंपरिक व्यवसायांच्या माध्यमातून या समाजाने पिढ्यान्‌पिढ्या राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. मात्र आजही समाजातील अनेक घटक आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करत आहेत

संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा. या निधीतून समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, व्यावसायिकांना कर्ज व अनुदान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन मिळावे. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षण व कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली

समाजाला शासनाच्या विविध समित्यांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटितपणे शासनदरबारी पाठपुरावा करेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला

नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

या भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाची जबाबदारी स्वीकारली
सोहळ्यात मोठ्या प्रमाणात समाज बंधू भगिनी उपस्थित होते

प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

– श्री. सचिन (बंटी) पितांबर सोनवणे – जिल्हाध्यक्ष
– श्री. चंद्रकांत (आप्पा) शिंदे – जिल्हा कार्याध्यक्ष
– श्री. गणेश वीरभान सोनवणे – जिल्हा सहकार्याध्यक्ष
– श्री. शिवाजी माधवराव बहाळकर – उपाध्यक्ष
– श्री. उमाकांत निकम – उपाध्यक्ष
– श्री. प्रशांत बानाईत – उपाध्यक्ष
– श्री. किरण नांद्रे – उपाध्यक्ष
– श्री. किशोर श्रीखंडे – उपाध्यक्ष
– श्री. अमोल आमोदकर – उपाध्यक्ष
– श्री. कुमार श्रीरामे सर – सरचिटणीस
– श्री. नरेश गर्गे – सहसरचिटणीस
– श्री. भरत चव्हाण – खजिनदार
– श्री. अरुण श्रीखंडे – प्रसिद्धीप्रमुख
– श्री. भिकन बोरसे – पश्चिम विभाग संघटक
– श्री. उदय सोनवणे – संघटक प्रमुख

याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुके व विभागांतील पदाधिकारी, महिला मंडळ, युवा संघटना आणि कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनीही पदग्रहण करून समाजसेवेची जबाबदारी स्वीकारली.

संघटनात्मक एकजुटीतून समाजाचा विकास साधणार

या पदग्रहण सोहळ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविणे, समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, गरजू कुटुंबांना मदत करणे, महिला व युवकांना संघटित करणे आणि समाजाच्या विविध प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडणे, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. किशोर मधुकरराव वाघ व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या समाजबांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एकजूट, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Tags: बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे
Previous Post

घरामागील वायर कट करताना शॉक लागल्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या

जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या
क्राईम

जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या

November 17, 2026
बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे
खान्देश

बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे

November 17, 2026
घरामागील वायर कट करताना शॉक लागल्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू
खान्देश

घरामागील वायर कट करताना शॉक लागल्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

November 17, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत चार जागा बिनविरोध; महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम!
Uncategorized

जिल्हा बँक निवडणुकीत चार जागा बिनविरोध; महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम!

November 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या

जळगाव हादरले! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत अज्ञात तरुणाची आत्महत्या

November 17, 2026
बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे

बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा स्वतंत्र निधी द्या – कल्याण दळे

November 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!