नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – चीनमध्ये भूकंप झाला असून, यात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणपूर्व भागात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून, काही भागातील वीज गायब झाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अनेक ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.
भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. स्थानिकांनी एएफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर चेंगडूमधील इमारतींना हादरे बसले. या ठिकाणी अनेक लोक करोना निर्बंधांमुळे घरात बंदिस्त आहेत.