• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुकली ठार ; दोन जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2023
in Uncategorized
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे ट्रॅक्टर वस्तीत शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमडदे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असते. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करणारे भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर हे आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले. या जोरदार धडकेमुळे एक बालिका ठार झाली असून तीन-चार घरे उध्वस्त झाली आहेत.

या दुर्घटनेत वैशाली बालू सोनवणे या ११ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला असून बानूबाई वाघ ( वय – ४२) ही महिला आणि पिंकी सोनवणे ( वय – ५ ) हे जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोषी ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळी आपले वाहन सोडून फरार झाला आहे. दरम्यान, परिसरातील वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आजची दुर्घटना घडल्याचा आरोप आमडदेकरांनी केला आहे.

या दुर्घटनेतील ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली नसली तरी कुठे तरी वाळू खाली केल्याचे दिसून येत आहे. अर्थात, वाळू खाली केल्यानंतर भरधाव वेगाने ट्रॅक्टर दामटल्यामुळे ही भयंकर घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे वाळू वाहतूक करणार्‍या बहुतांश वाहनांवरील क्रमांक हा पुसलेला असतो. याच प्रमाणे या ट्रॅक्टरच्या क्रमांकातील एक अक्षर खोडलेले असल्याने त्याचा नेमका क्रमांक कोणता याची ओळख पटविणे कठीण होत आहे. अर्थात, चॅसीस क्रमांकावरून मालकाचा पत्ता शोधता येणार आहे. यामुळे यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली असून तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोवर भडगाव पोलिसात नोंदणी करण्याचे काम सुरू होते. तर या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #bhadgaon accident newshttps://kesariraj.com/chimukli-thar-5-april-23-n-4/
Previous Post

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Next Post

व्यवसायिकाला मारहाण ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्यवसायिकाला मारहाण ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon