• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

बद्रीनाथ दर्शनापूर्वी प्रकृती बिघडल्याने हृदयविकाराचा त्रास

चोपडा (प्रतिनिधी):- येथील ५९ वर्षीय प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंड राज्यात चारधाम यात्रेदरम्यान निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेल्या असताना त्यांची अचानक प्रकृती खालावली. दरम्यान, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधल्याने त्यांचे पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चोपड्यातील पंकज नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिभा बोरोले या १६ भाविकांच्या गटासोबत चारधाम यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या. यात्रेच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या गटाने क्रमाक्रमाने यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ मंदिर येथे दर्शन घेण्याचे नियोजन होते. मात्र, बद्रीनाथ दर्शनाच्या आदल्या दिवशी रात्री अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने आणि अस्वस्थता वाढल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी चमोली जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ऑक्सिजन सपोर्टसह तातडीने उपचार सुरू केले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १ मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती चोपड्यात पोहोचताच संपूर्ण शहरात शोककळा पसरली. प्रतिभा बोरोले यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून आवश्यक कागदपत्रे आणि वैद्यकीय औपचारिकता जलदगतीने पूर्ण करून पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था केली.

प्रतिभा बोरोले या चोपड्याचे माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी, पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वहिनी आणि उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या काकू होत. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्या म्हणून सर्वांना एकत्र ठेवणाऱ्या, तसेच धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

Next Post

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon