चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील न्हावे गावच्या शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी ६४ हजार रुपये किमतीच्या उच्च दाबाच्या (High Tension) ॲल्युमिनियम तारा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मांगीलाल परमार (वय ३५, व्यवसाय- ठेकेदार, मूळ रा. भटौनी भौरा, सिहोर, मध्य प्रदेश, सध्या रा. खडकी बायपास, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. न्हावे गावच्या शेत शिवारात दि. २८ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून ते दि. ३० मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.
अज्ञात चोरट्याने या परिसरातील सुमारे १.२ किलोमीटर लांबीच्या आणि ५५ वर्ग MM (55 Sq.mm) जाडीच्या उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारा कोणाच्याही नकळत, लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्या. या चोरी गेलेल्या जुन्या वापरत्या तारांची एकूण किंमत ६४,००0 रुपये इतकी आहे.
या चोरीच्या प्रकारानंतर ठेकेदार राहुल परमार यांनी दि. २२ जून २०२६ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २०२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच या गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गोपाळ पाटील करत आहेत.









