• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी ताब्यात, एक संशयितासह तीन दुचाकी जप्त

चाळीसगाव, ( प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच एका संशयित व्यक्तीकडून कागदपत्रांशिवाय आढळून आलेली आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.

पुढील तपासात सदर मोटारसायकल त्याने प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पातणादेवी रोड, चाळीसगाव) यास विकल्याचे समोर आले. त्यानुसार प्रशांत राजपूत यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपींनी चोरीची मोटारसायकल २० हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांकडून चोरीस गेलेली मोटारसायकलसह एकूण सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गुन्हेगार तपासणी व पेट्रोलिंग करीत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक व्यक्ती विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन फिरताना आढळून आला. संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. मात्र मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याच्याकडील सुमारे २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक होत आहे.


 

 

Tags: chalisgavat lcbchi mothi karvai
Previous Post

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1xbet russia

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी
1xbet russia

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon