• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिंचपुरा येथील सात महिन्यापूर्वी बांधलेला ५० लाखांचा बंधारा पाण्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा येथे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीत चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या साठवण बंधाऱ्यामुळे चार घरे वाहून गेले असून खबरदारी म्हणून दुसऱ्याच दिवशी सुमारे सात महिन्यापूर्वी बांधलेला ५० लाख रुपयांचा बंधारा फोडण्यात आला. त्यामुळे शासनाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक बाबी लक्षात न घेता बंधारा बांधल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला. त्यामुळेच पुराचे पाणी थेट घरांमध्ये घुसून नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेत राजेंद्र जयराम पाटील, समाधान उत्तम पवार, गोविंदा तुळशीराम पाटील आणि प्रकाश तुळशीराम पाटील यांची घरे संसारोपयोगी साहित्यासह वाहून गेली आहेत. डोक्यावरील छत हिरावले गेल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी ही चारही कुटुंब उघड्यावर आले आहेत. आज हे कुटुंब गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रयाला आहेत. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात दिल्याने कशीबशी गुजराण करत आहेत. डोळ्यादेखत घर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने आमचे पुनर्वसन करावे, या प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांनी केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?
चिंचपुरा गावाच्या शेजारून बहुळा नदी वाहते. या नदीवर काही वर्षांपूर्वी एक साठवण बंधारा होता. तो जीर्ण झाल्याने नदीवर नव्याने साठवण बंधारा मंजूर झालेला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवा बंधारा हा नियोजित ठिकाणी न बांधता मूळ जागेपासून सुमारे १००मीटर अंतरावर म्हणजेच गावाच्या अगदी जवळ ७ ते ८ महिन्यापूर्वी बांधला. धक्कादायक बाब म्हणजे, हा बंधारा बांधताना सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारची भौगोलिक परिस्थिती, स्थान तसेच तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या नाहीत. सुमारे ५०लाख रुपये खर्चून नवा बंधारा बांधण्यात आला. मात्र, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने बहुळा नदीला मोठा पूर आला. या बंधाऱ्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने पुराचे पाणी गावाच्या दिशेने वळले. त्यामुळे नदीच्या काठावरील घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. राजेंद्र पाटील, समाधान पवार, गोविंदा पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या घरांचे या घटनेत सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील संसारोपयोगी सामानही पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसह लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. पुराचे पाणी ओसरत नसल्याने अजून नुकसान होण्याची भीती होती. त्यामुळे लागलीच तांत्रिक बाबी लक्षात न घेता बांधलेला बंधारा फोडण्यात आला. त्यानंतर पूर काही प्रमाणात कमी झाला आणि इतर घरांचे संभाव्य नुकसान टळले.

आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु, अजून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थितीत चारही कुटुंब उघड्यावर वास्तव्याला आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

भिंत खचली, चूल विझली, लग्नही मोडले
या दुर्दैवी घटनेमुळे राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर तर दुसरेही संकट उभे राहिले आहे. त्यांचा मुलगा राहुल याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न जमले होते. परंतु, लग्नापूर्वीच पुराच्या पाण्यात त्यांचे घर, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. अशा परिस्थितीत मुलीकडच्या लोकांनी मुलगी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तुमच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. मुलगी कशी द्यायची? असे मुलीकडच्या लोकांनी सांगितले. त्यामुळे पाटील कुटुंबीय काहीही करू शकले नाहीत. आपल्यावर ओढवलेल्या संकटाची आपबिती सांगताना राहुल पाटील याला गहिवरून आले होते. आम्हाला काहीही नको फक्त आमचे घर परत द्या, अशी भावनिक मागणी त्याने बोलताना केली.


 

 

Previous Post

रोजगार प्रश्नांवर जळगाव जिल्हा युवक काँग्रेसची बाईक रॅली

Next Post

नूतन पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नूतन पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon