• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारमधून १२.५० लाखांची रोकड लंपास; तेलगळतीचा बहाणा करून चोरट्यांचा डाव यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2026
in Uncategorized
0
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

कारमधून १२.५० लाखांची रोकड लंपास; तेलगळतीचा बहाणा करून चोरट्यांचा डाव यशस्वी

जळगावात व्यापाऱ्याची फसवणूक; चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील गणपती नगर परिसरात एका फळ घाऊक व्यापाऱ्याची १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चलाखीने लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. तेलगळती होत असल्याचा बहाणा करून व्यापाऱ्याला कारमधून खाली उतरविण्यात आले आणि संधी साधून कारच्या मागील सीटवर ठेवलेली रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळविली. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ओमप्रकाश मंधान (वय ४४, रा. गणपती नगर, जळगाव) हे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी येथील “अमर फ्रूट” या घाऊक फळ व्यवसायाचे संचालक आहेत. ३ ऑगस्ट रोजी सकाळी विविध व्यापाऱ्यांकडून त्यांना एकूण १३ लाख रुपयांची रोकड मिळाली होती. त्यापैकी ५० हजार रुपये वेगळे काढून उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये त्यांनी काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवले.

सायंकाळी दुकान बंद करून ते त्यांच्या KIA Sonet (एमएच ४६ बीव्ही ३२९५) या कारने घरी निघाले. रात्री सुमारे ८.०५ वाजता घराजवळ कार पार्क करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारमधून ऑईल गळत असून धूर निघत असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून ते कारमधून खाली उतरले.

याच संधीचा फायदा घेत पांढरा शर्ट व काळी जिन्स परिधान केलेल्या एका अज्ञात इसमाने कारचा मागील दरवाजा उघडून रोकड असलेली बॅग उचलली आणि धूम ठोकली. व्यापाऱ्याने आरडाओरड करत पाठलाग केला असता आरोपी एका मोटारसायकलवर साथीदारासोबत बसून इच्छादेवी चौकाच्या दिशेने पसार झाला. त्यांच्या मागे काळ्या रंगाच्या पल्सरवर आणखी दोन साथीदार पळून गेल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

चोरट्यांनी ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांमध्ये ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.


 

 

Previous Post

जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Next Post

चाळीसगावात घरफोडी; घरातून ८० हजारांची रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगावात घरफोडी; घरातून ८० हजारांची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दिवसा घरफोडी; २.५२ लाखांचा ऐवज लंपास

August 4, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
Uncategorized

अमळनेरमध्ये घरफोडी; बंद घर फोडून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

August 4, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात घरफोडी; घरातून ८० हजारांची रोकड लंपास

August 4, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कारमधून १२.५० लाखांची रोकड लंपास; तेलगळतीचा बहाणा करून चोरट्यांचा डाव यशस्वी

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दिवसा घरफोडी; २.५२ लाखांचा ऐवज लंपास

August 4, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

अमळनेरमध्ये घरफोडी; बंद घर फोडून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon