• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात पुन्हा खून : पत्नीचा गळा आवळून हत्या करीत पती फरार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यात पुन्हा खून : पत्नीचा गळा आवळून हत्या करीत पती फरार !

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवार दि. २३ मार्च रोजी रोजी भल्या पहाटे समोर आली असून संशयित आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.

विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ जि. बीड येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेख हे चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते.(केसीएन)अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज रात्री पत्नीशी भांडण करीत असे. शनिवारी रात्रीही दारूच्या नशेत तो घरी आल्यावर पत्नी सना (वय २५) हिला शिवीगाळ करू लागला. शेजारी असलेल्या सासूने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. जेवणाचा आग्रह केल्यानंतर अजीज व सना आपल्या मुलांसह खोलीत झोपायला गेले.

रविवारी पहाटे कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडताच सासू आणि इतर मजुरांनी पाहिले तेव्हा सना ही रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याचे आढळले.(केसीएन) तिच्या डोळ्या आणि नाकातून रक्त येत होते तसेच गळ्यावर व्रण असल्याने गळा आवळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सना शेख हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, गळा दाबल्याचा संशय असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर हत्या कशी घडली याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर पती अजीज शेख फरार झाला असून त्याच्यावरच पत्नीच्या हत्येचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृत सना हिचा भाऊ अजहर नियाजउद्दीन शेख मन्सूर याच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अजीज सलीम शेख याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि जनार्धन खंडेराव, पो.कॉ. सुकराम सावकारे, मनोहर बनसोडे, भुषण माळी, साहेबराव कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव करत आहेत. पती अजीज शेख याला अटक करण्यासाठी पोलीस पथके शोधमोहिम राबवत आहेत.


 

 

Tags: bhusawalat-punha-khun
Previous Post

मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अपघाती नुकसान भरपाईपोटी रूपये ५० लाखाचा धनादेश

Next Post

वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon