भुसावळ (प्रतिनिधी ) – महात्मा गांधी सप्ताहनिमित्त भुसावळ विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भुसावळ विभागात विविध ठिकाणी अवैध दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करून हजारो लिटर रसायन यासह मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई केली.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्मानीय आयुक्त कांतीलाल उमाप ब, संचालक, अं. व दक्षता . सुनील चव्हाण , तसेच विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ नाशिक विभाग नाशिक, लीस अधीक्षक श्री. मुंढे आणि अधीक्षक जळगाव जितेंद्र गोगावले ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर महात्मा गांधी सप्ताह निमित्त गावठी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेशानुसार विभागीय निरीक्षक, सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ जि.जळगाव यांच्या पथकास मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारात पुर्णा नदीच्या पात्रातील किनाऱ्यांवर , ता.मुक्ताईनगर जि. जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु निर्मिती होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक ०८/ रोजी विभागीय निरीक्षक, सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि.जळगाव यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पुर्णा नदीपात्रातील मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकुन एकुण ११९६० लि. रसायन, गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायनाचे प्लॅस्टीक व पत्री ड़्म मिळुन रु.२,६२,५००/- चा मुहेमाल मिळुन आला. रसायन जागीच नष्ट करण्यात आले. घटनास्थळी कोणताही आरोपी मिळुन आला नसल्याने आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
यांनी केली कारवाई
कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ सहाय्यक पोलिस निरीक्षक जालींदर राजेश नि. सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, अमोद भडागे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिमा तपासणी नाका, पुर्णाड, तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख, गोकुळ अहिरे सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान सर्वश्री नितीन पाटील, योगेश राठोड, अमोल पाटील, भुषण परदेशी, नंदु नन्नवरे, विजय परदेशी आणि पोलिस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वी रित्या पार पाडली. गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक, सुजित ओ. कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश नि. सोनार आणि दुय्यम निरीक्षक . अमोद भडागे हे करीत आहेत.तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यांत या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणा-यांविरोधात कारवाया सुरुच राहतील.असे म्हटले आहे.