भुसावळ : – येथील रेल्वे स्थानकावर कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आज मंगळवारी कारवाई करण्यात येऊन सुमारे ३ ते ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरोनामुळे परराज्य आणि इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने आणि भुसावळ हे मोठे जंक्शन असल्याने खाद्यपदार्थ घेण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने आज २० रोजी मोठी कारवाई रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली . यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.