न्यायालयाचे आदेश, राज्यातील पहिलाच निकाल
जळगाव (प्रतिनिधी) :- बीएचआर सोसायटीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात ८२
गुन्हे नोंदवण्यात येवून त्याचे खटले जळगाव येथील सत्र न्यायालयातील
स्पेशल एम.पी.आय.डी. कोर्टात सुरु आहेत. सदर खटल्याचे कामी बि.एच. आर.
सोसायटीने संपूर्ण महाराष्ट्रात भाड्याने दुकाने घेवून त्यात त्यांचे
कार्यालय सुरू केले होते. गुन्हे नोंद होताच तपास यंत्रणेमार्फत सदरची
कार्यालये सील केली होती.सदर कार्यालय सील केल्याने जागा मालक यांना भाडे
मिळणे तत्काळ बंद झाले मात्र व्यापारी तत्वाप्रमाणे शासनाचे विविध कर
त्यांना आजतागायत भरावे लागत आहे. तशी कर आकारणी भरणे शक्य नसल्याने
बहुतांश दुकाने स्थानिक प्राधिकरणांनी कर थकबाकीपोटी जप्त देखील केली
आहे.
अमरावती येथील अश्याच दुकान मालक श्रीकांत लक्ष्मीनारायण झंवर यांनी अॅड.
अतुल द. सुर्यवंशी यांचे मार्फत स्पेशल कोर्टात अर्ज दाखल करून त्यांची
व्यथा मांडली. न्यायालयाने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे यांचे व.
बि.एच.आर. संस्थेचे अवसायक यांचे म्हणने ऐकुन कायद्याच्या तरतुदी, दुकान
मालक श्रीकांत झंवर यांचे झालेले व होणारे आर्थिक नुकसान, मिळकतीचा घसारा
व कर थकबाकीसाठी झालेली शासकीय जमींची कार्यवाही यांच्या सर्वांकश
विवेचनाचे आधारे दुकान मालक श्रीकांत झंवर यांची मिळकत दोन महिन्याच्या
आत मोकळी करून तसा खुला ताबा देण्याचे आदेश पारित केलेले आहे.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने संपूर्ण महाराष्ट्रात बी..एच.आर. संस्थेचे
शेकडो कार्यालय सील केलेले असून श्रीकांत झंवर यांची मिळकत मोकळी करून
देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच निकाल असल्याचे अॅड. अतुल द. सुर्यवंशी
यांनी कळवले. या निकालाने महाराष्ट्रातील बी.एच.आर. संस्थेच्या गुन्ह्यात
अडकलेल्या मिळकतींच्या मालकांना त्यांच्या मिळकती पुन्हा ताब्यात
मिळवण्याचा आशेचा मार्ग निर्माण झाला आहे.