• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

कौटुंबिक सुखासाठी भोंदूबाबाची शरीरसुखाची मागणी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0


पुणे ( प्रतिनिधी ) – वाकड येथे भोंदूबाबाचा विकृतपणा समोर आला आहे. मूळचा बीडचा असलेला आरोपी भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेचा पती स्वतः बीडला जाऊन या भोंदूबाबाला भेटला आणि त्याने पत्नीला कंबरेपासून खाली अपंग करण्याची मागणी केली. यानंतर आरोपीने पीडित महिलेला फोन करून ही विकृत मागणी केली. पोलिसांनी या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. विलास बापूराव पवार उर्फ महाराज (रा. पिंपळवंडी पाटोदा, बीड) असे या आरोपी भोंदू बाबाचे नाव आहे.

पीडित महिला आणि तिच्या पतीचे दररोज घरात भांडण होत होते. यानंतर पतीने माझे पत्नीसोबत दररोज भांडण होते. तुम्ही माझ्या पत्नीला जादूटोणा करून कंबरेच्या खाली अपंग करा, अशी मागणी आरोपी भोंदू बाबाकडे केली. नंतर भोंदू बाबाने पीडित महिलेशी फोनवरून संपर्क साधत तुमचा पती तुमचे वाईट करण्यास सांगत आहे. तुम्हाला तुमचा संसार, कुटुंब सुखी ठेवायचा असल्यास माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा, अशी मागणी केली. पीडित महिलेचे आणि पतीचे फारसे पटत नव्हते. त्यांच्यात दररोज खटके उडायचे. याच भांडणाला कंटाळून पतीने थेट बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे जाऊन विलास पवार या भोंदू बाबाची भेट घेतली. तिथं माझ्या पत्नीला कंबरेच्या खाली अपंग करून जादूटोणा करा अस सांगितलं. महिलेचा पती तिथे ३-४ दिवस राहिला. त्यानंतर, भोंदू बाबा विलासने स्वतः पीडित महिलेला फोन करून तुझा पती माझ्याकडे आला होता. त्याने तुला कंबरेपासून खाली अपंग करण्यास सांगितले आहे असे सांगितले.

भोंदू बाबा दररोज फोन करून महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. भोंदू बाबाने पीडित महिलेला भीती दाखवत तुमच्या पोटात गाठी झाल्या असून तुमचं आयुष्य थोडेच राहिले आहे असं देखील सांगितले. तुम्ही या सर्वातून सुटू शकता, असं म्हणत पर्याय सुचवला. यानुसार ज्या व्यक्तींच्या विशिष्ट अवयवावर आणि तळ हातावर तीळ आहे त्याच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यास तुमचे कुटुंब, संसार सुखी होईल असा दावा केला. काही वेळानेच भोंदू बाबाने स्वतःचा अश्लील व्हिडिओ पीडित महिलेला पाठवला. त्यात तळ हातावर आणि विशिष्ट अवयवावर तीळ असल्याचं व्हिडीओमधून त्या महिलेला दाखवलं. महिलेला फोन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.

यामुळे पीडित महिला घाबरली. अखेर महिलेने वाकड पोलिसांकडे धाव घेतली भोंदू बाबा विलासवर गुन्हा दाखल करण्यात आला. पो नि डॉ. विवेक मुगळीकर आणि स पो नि अभिजित जाधव यांनी पीडित महिलेला बोलवून घेतले. पीडित महिलेला सांगण्यात आलं की, तुम्ही भोंदू बाबाला भेटण्यासाठी पुण्यात बोलवा. मग आम्ही त्याला पकडतो. भोंदू बाबाला फोन करून पुण्याला बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी डांगे चौक येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पीडित महिलेच्या पतीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पो नि डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली


 

 

Tags: #pune
Previous Post

पत्नीच्या हत्येच्या आरोपात आरोपी पतीला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

भुसावळातील विवाहितेची हत्या पतीकडूनच ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळातील विवाहितेची हत्या पतीकडूनच ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon