जळगाव ( प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र आंबटकर सर यांनी भूषवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. त्यांच्या सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वावलंबन आणि देशसेवेच्या विचारांची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आंबटकर सरांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महान नेत्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्याची ओळख होऊन देशप्रेम, स्वच्छता, सत्य आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भारती ठाकरे मॅडम व आभार प्रदर्शन श्री ललित पाटील सर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








