निवडणूक झाली बिनविरोध
पाचोरा (प्रतिनिधी) : – तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील उपसरपंच शशिकांत वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज उपसरपंच पदासाठीची निवडणुक सरपंच अस्ताना तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात प्रदिप प्रताप वाघ यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. दिलीप वाघ, पी.टी.सी.चेअरमन संजय वाघ उपस्थित होते. उपसरपंच निवडीप्रसंगी दिलीप वाघ यांनी गावातील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन पुढे होणाऱ्या कामांबाबत माहिती देत गावाच्या विकासासाठी एकजूटीने कामे करण्याचा सल्ला दिला. ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी ललित वाघ, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत वाघ, शोभाबाई वाघ, सुभाष शिंदे, माधूरी काटे,सायराबाई मेवाती, कौशल्याबाई बाविस्कर, गुलाब तडवी, अशोक बडगूजर,उषाबाई चौधरी, कविता गवांदे, सुजाता दारकोंडे प्रदिप वाघ, तुषार आढाव, संगिता शेवगे उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच प्रदिप वाघ यांचे माजी आ. दिलीप वाघ, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ, दगाजी वाघ, ललित वाघ यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रताप वाघ, संजय पाटील, रमेश कोकणे,अली मेवाती, राजु गाव्हंडे, किरण वाघ, गोलू वाघ, हारुण मिस्तरी, सोपान तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.