पाटणा (वृत्तसंस्था ) ;-बिहारमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची भयंकर घटना घडली आहे. घृणास्पद कृत्य करून महिलेसोबत असे काही केले त्याने घटनेचा खुलासा झाला.
बिहारच्या छपरा जिल्ह्यातील ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा तपास केला असतो तो जवळपास आठवड्याभरापूर्वीचा आहे. गोसी अमनौर ते परशुरामपूरकडे जाणाऱ्या आरईओ मार्गा दरम्यान मोठ्या कालव्याच्या आजूबाजूला असणाऱ्या निर्मनुष्य जागी आरोपींनी ही घटना घडवून आणली आहे.
व्हिडीओमध्ये महिला आपल्या पतीसोबत बाहेर जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून बळजबरीने कालव्याच्या निर्मनुष्य ठिकाणी नेऊन पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. शिवाय तिचा व्हिडीओही बनवला. नराधमांनी बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर तो सारण येथील पोलीस अधिक्षक संतोष कुमार यांच्या हाती लागला. त्यांनी व्ह़िडीओची तत्काळ दखल घेत अमनौर पोलीस स्थानकाला घटनेचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केल्यानंतरही पीडित महिला किंवा तिचा नवरा पोलिसांसमोर आलेले नाहीत. कदाचित भीतीमुळे आणि लाजेपोटी या जोडप्याने तक्रार नोंदवली नसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलीस अधिक्षक संतोष कुमार यांच्या म्हणण्यानुसार पीडित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचबरोबर या सर्व अटक केलेल्या आरोपींविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत, त्या आधारावर या सर्व आरोपींना कायदेशीररीत्या लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी याची प्रक्रिया न्यायालयात सुरू केली जाईल.