सावदा ;- येथील रावेर मार्गावरील हॉटेल कुंदन जवळ काल रात्री दुचाकीवरून ( क्र – एम एच १९ – सी एल ७२५७ ) जाणारे लक्ष्मण पाटील ( वय -६० , रा – गवत बाजार , सावदा ) रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या डंपरवर धडकून ठार झाले. या दुर्घटनेत त्यांच्या दुचाकीचेही बरेच नुकसान झाले. या अपघाताबद्दल भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात डम्पर ( क्र – एम एच १९ – सी वाय – ४८७६ ) च्या चालाकाविरोधात गु र न ९६ भा द वि कलम ३०४ ( अ ) , २७९ , ३३७ , ३३८ , ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर अंधार असूनही इंडिकेटर न लावता निष्काळजीपणे वाहन उभे करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस काराभूत ठरला म्हणून डम्पर ( क्र – एम एच १९ – सी वाय – ४८७६ ) च्या चालाकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ उमेश पाटील करीत आहेत.