मुंबई (वृत्तसंस्था ) ;- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. याबाबत वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या अतिदक्षता विभागामध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी खासगी कारण देत आगामी 3 महिने पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याची माहिती दिली होती. यादरम्यान पक्षाचे कार्य सुरू रहावे यासाठी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील पाच जिल्ह्यात निवडणुकी असून या काळात पक्षाला अध्यक्ष असणे महत्त्वाचे आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले होते.