तिघांना केली अटक
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात एलसीबीच्या पथकाने गुप्त माहिती काढून दुचाकी चोरट्यांची गँग पकडली आहे. चोरट्यांकडून जळगावात चोरलेल्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली आहे.
एलसीबीच्या पथकातील हवालदार विनोद पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, टाकरखेडा ता.जामनेर येथील विशोल गोपाल भोई हा चोरीची मोटारसायकल घेवून फिरत आहे, खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. पथकातील अंमलदार यांनी सुरेश पाडवी हा त्याचे गावी टाकरखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास टाकरखेडा येथून सापळा रचत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे दोन साथीदार देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, सुरज अशोक पारधी (सांळुखे), रा.टाकरखेडा ता.जामनेर यांची नावे सांगितली. पथकाने यांना देखील ताब्यात घेतले आहे.
तिघांकडून ४ लाख ३३ हजाराच्या १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहे. सर्व दुचाकी जळगाव शहरातून चोरलेल्या आहेत. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हवालदार गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन यांच्या पथकाने पार पाडली आहे.