अमळनेरः –कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील दापोरी बु. येथे शुक्रवारी सकाळी आठ अवजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
युवराज कौतिक पाटील (वय-५३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. युवराज पाटील हे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शेतात सततची नापिकी मुळे उत्पन्न मिळत नव्हते. त्यात सोसायटीचे पीक कर्ज व हात उसनवारीअसे त्यांच्यावर कर्ज होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यात येऊन त्यांनी शुक्रवारी सकाळी घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार होता. सदर घटनेची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.