भोपाळ ;- मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात शुक्रवारी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका महिलेला रस्त्र्यावर लाठीने मारहाण केली जात आहे. महिला आरडाओरडा करते, पण तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. चार जणांनी महिलेला पकडून ठेवले असून एक व्यक्ती तिला काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
A woman in Dhar District, Madhya Pradesh was mercilessly beaten with a stick. The main accused (Sarpanch ) is arrested, other individuals involved are yet to be arrested. pic.twitter.com/DCgNVykFSn
— Mohammed Zubair (@zoo_bear) June 21, 2024
हा व्हिडिओ धार जिल्ह्यातील तांडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. विशेष म्हणजे महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये गावच्या सरपंचाचाही समावेश आहे. जाम सिंह भुरियाचा मुलगा नूर सिंग नावाच्या या सरपंचाला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. धार एसपी मनोज कुमार सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये अज्ञात व्यक्ती एका महिलेला मारहाण करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ पाहताच मी आणि माझ्या टीमने घटनास्थळाची चौकशी केली. यानंतर मुख्य आरोपी महिलेला मारहाण करत होता. त्याला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचे पथक रवाना झाले आहे.