जळगावातील सत्यम पार्क येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजी नगर परिसरातील सत्यम पार्कमध्ये एका इसमाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १९ जून रोजी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रफुल्ल पिराजी थोरात (वय ६०, रा. सत्यम पार्क, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. प्रफुल्ल थोरात यांनी दि. १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ थोरात यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत थोरात यांना मयत घोषीत केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप राजपुत हे करीत आहे.